“महाराज, मला पायरीचा दगड व्हायचं आहे. “…..
आजकाल सार्वजनिक बांधकाम मोठ्या प्रमाणात होत आहेत. रस्ते, साकव, छोटे ब्रीज, सरकारी निवासस्थान वगैरे वगैरे.. या कामांची गुणवत्ता आणि यामध्ये होणारे आर्थिक घोटाळे व त्या अनुषंगाने होणारे आरोप- प्रत्यारोप हे आपणं नेहमीच ऐकतो, अनुभवतो. रस्ते वाहून जाणे, नव्या इमारतीला गळती लागणे हे तर नित्याचेच झाले आहे. याचं कारण असं की कंञाटदारानां दिली जाणारी काम ही विविध पातळीवर टक्केवारी निश्चित करुन दिली जातात, थोडक्यात संबंधित अधिकारी असो किंवा ज्यांच्या ताब्यात ती “व्यवस्था” असेल ती मंडळी असो ते त्या संबंधित कंञाटदारानां विचारतात, ” बोला, किती टक्के देणार ‘…
महाराष्ट्रात म्हणा वा देशात सगळेचं राजकीय पक्ष हे सत्ता मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचां फक्त आणि फक्त वापर करतात. महाराजांच्या विचारांशी आणि त्यांच्या कार्याशी यांचा काडीचाही संबंध नसतो.
मालवण येथील छञपतींचा घाईघाईने अल्पावधीत उभारलेला पुतळा दुर्दैवाने कोसळला आणि संपूर्ण भारतात सलग सुमारे पंधरा दिवस हा विषय राष्ट्रीय व प्रादेशिक प्रसारमाध्यमांनी लावून धरला. छञपती हे अवघ्या भारत वर्षाचा अभिमान आणि अस्मिता असल्याने खुद्द देशाच्या पंतप्रधानांनीही शिवभक्तांची जाहीर माफी मागितली.
महाराजांच्या काळात उभारलेले गडकिल्ले आणि तटबंदी साडेतीनशे वर्षानंतरही अभेद्य आहे. महाराजांच्या काळात रायगड ही हिंदवी स्वराज्याची महाराजांच्या स्वप्नातील राजधानी हिरोजी इंदुलकर यांनी उभी केली. राजधानीचं बांधकाम पूर्ण झाल्यावर हिरोजी महाराजांकडे गेले. तेव्हा ते महाराजांना म्हणाले, ” महाराज आपल्याकडे मला काही मागायचं आहे” महाराज म्हणाले, “बोला, बोला हिरोजी काय पाहिजे ते बोला, अहो पुढची हजारो वर्षे मजबूत रहाणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूंचे आपण शिल्पकार आहात. हिंदवी स्वराज्यांची साक्ष देणारीअतिशय सुंदर व मजबूत राजधानी आपण उभी केलीत.. आम्ही आपल्यावर खुश आहोत… तुम्ही तुम्हाला जे काही पाहिजे ती इच्छा व्यक्त करा. ” यावर हिरोजी घाबरत घाबरत म्हणाले'” महाराज मला बाकी काही नको, मला फक्त पायचा दगड व्हायचं आहे, या रायगडाच्या पायथ्याला लावलेल्या एका दगडावर माझं नावं कोरायचं आहे, “हे ऐकून महाराज म्हणाले, मला वाटल होत बक्षिस म्हणून जडजवाहीर मागाल… तुम्ही तर मोठ्या मनाने अगदी छोटी इच्छा व्यक्त केली….
तात्पर्य, महाराजांच्या काळातही संपत्ती, टक्केवारी आणि पदांसाठी फंदफितुरी व गद्दारी करणारे सूर्याजी पिसाळ होते तसेच स्वरांज्यांच्या रक्षणासाठी सच्चे , निष्ठावंत हिरोजी इंदुलकरां सारखे पाईक होते. नाहीतर आज टक्केवारीचं राजकारण करून रयतेचा पैसा लुटणारे पावलोपावली अनुभवायला मिळतात. म्हणूनचं रस्त्यानाही तडे गेलेत आणि असलेल्या नसलेल्या विश्वासालाही.
…. अॅड. नकुल पार्सेकर…
______________________________
*संवाद मीडिया*
*सुवर्णसंधी ! सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!*
*बीएससी नर्सिंग (BSc Nursing)* करण्याची सुवर्णसंधी.
https://sanwadmedia.com/147064/
*Affiliated to MUHS,Nashik,DMER,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये*
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग , दापोली.*
(Affiliated to MUHS,Nashik,DMER,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)
*बीएससी नर्सिंग*(BSc Nursing)
Eligibility- 12th Science (PCBE)With MH BSC NURSING CET can apply.
• Duration : 4 Years
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
संपर्क:
7887561247/ 9420156771
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*