You are currently viewing काव्यपुष्प – ६३ वे

काव्यपुष्प – ६३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि. देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली*

 

*काव्यपुष्प – ६३ वे*

अध्याय – ११ वा , कविता – ३ री 

—————————————-

जमलेल्या मंडळीस म्हणे भास्कर । माझ्या सुचनेस द्यावा होकार । होईल माझे स्वप्न साकार हो ।। १ ।।

 

समर्थांचे स्मारक भव्य व्हावे । पाहुनिया हे, नतमस्तक व्हावे। ऐसे काम व्हावे । आपल्या हातुनी हो ।। २ ।।

 

भक्त सारे शेगावी येतील । हे स्मारक पहातील । वा,किती,

भव्य हो काम, म्हणतील । कौतुक असे हे शेगावचे ।। ३ ।।

 

भास्कराचे बोल हे पटले ।मग सर्वांनी कबुल केले । स्मारक

भव्य असे करू म्हणाले । शिष्य- भक्त जमलेले ।। ४ ।।

 

हे शब्द अशाश्वक ऐकुनी । भास्कर संतोषला मनी ।

म्हणे, आता मी समाधानी । लाभली शांती माझ्या मनाला ।।५ ।।

 

स्वामी,म्हणे, भास्कराला त्रंबकेश्वर जाऊ । औषधी तेथे घेऊ । उपचार करून घेऊ । कुत्र्याच्या विषावरी ।। ६ ।।

 

म्हणे भास्कर, स्वामी । असता सोबत तुम्ही । सारी औषधी कुचकामी । नको मज असे काही ।। ७ ।।

 

स्वामी म्हणती, भास्करा । तू ऐक माझे जरा । स्थान-महिमा थोर खरा । मानावा मनापासून रे ।। ८ ।।

 

मग मंडळी शेगावाहून निघाली । शिवरात्रीस आली ।

त्र्यंबकेश्वरा थांबली । दर्शनासाठी ।। ९ ।।

—————————

क्रमशः करी लेखन कवी अरुणदास

—————————————-

कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे – पुणे.

—————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा