You are currently viewing सावंतवाडी शिवसेना पक्षाच्यावतीने संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध

सावंतवाडी शिवसेना पक्षाच्यावतीने संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध

सावंतवाडी शिवसेना पक्षाच्यावतीने संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध

सावंतवाडी

शिवसेना पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून दिलेल्या राज्यव्यापी आदेशाप्रमाणे आज सावंतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर जमून शिवसेना पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. श्री. राहुल गांधी यानी परदेशात जावून आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या संविधान विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, संविधान बचाव श्री. राहुल गांधी यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख श्री. नारायण राणे, उपातालुकाप्रमुख श्री. गजानन नाटेकर, श्री. संजय माजगांवकर, विभागप्रमुख श्री. शेखर मांजरेकर, श्री. महेश ऊर्फ पप्पू सावंत, श्री. राजन परब, श्री. शंकर नाईक, माजी नगरसेवक श्री. तानाजी वाडकर, सौ. शर्वरी धारगळकर, सौ. शिवानी पाटकर, सौ. शुभांगी सुकी, चराठा सरपंच सौ. प्रचिती कुबल, महिला तालुका उपसंघटक सौ. सेजल लाड, उपविभागप्रमुख श्री. संदेश सोनुर्लेकर, श्री. विजय देसाई… श्री. रुपेश नाटेकर, युवासेना श्री. अमित हवालदार, तालुका उपसंघटक श्री. संजय गावडे, उपतालुकाप्रमुख श्री. जिवन लाड, श्री. कृष्णा लाखे, शाखाप्रमुख श्री. अभय राणे, श्री. राजन बरागडे, श्री. बापु कोठावळे, शहरसचिव श्री. विश्वास घाग, श्री. एकनाथ हळदणकर आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा