पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार! – पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोंडकर
मालवण
पर्यटन व्यावसायिक महासंघ व टीटीडीएस संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्हयाचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यटन महासंघातर्फे जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील अपरिचित पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे तसेच राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा स्वदेश दर्शन २.० या योजनेत समाविष्ट असून त्या माध्यमातून बीच टुरिझमबरोबर अॅग्रो, हिस्ट्री, मेडिकल, फॉरेस्ट, मँग्रोज, धार्मिक टुरिझमसाठी सर्वसमावेशक विकास आराखडा बनविण्याची विनंती करण्यात आली. यावेळी अनिल पाटील यांनी सांगितले,
विकासासाठी आवश्यक सर्व बाबींचा विचार करून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार तसेच जिल्हयात पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघासही सहकार्य करणार, असे सांगितले, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ सोशल मीडियाचे अध्यक्ष किशोर दाभोलकर, टीटीडीएस अध्यक्ष टीटीडीएस सहदेव साळगावकर, कार्याध्यक्ष रवींद्र खानविलकर, पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, रामा चोपडेकर, मिलिंद झाड़, मनोज खोबरेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.