“द ओरिजिन” च्या दडपशाही विरोधात २४ सप्टेंबर रोजी उग्र आंदोलन*
*शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर यांचा इशारा*
*दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात “द ओरिजन” या प्रकल्पाने येथील ग्रामस्थ आणि पोट भागिदार यांचा विश्वासघात केला आहे, तसेच प्रशासनही त्यांना साथ देत आहे द ओरिजनने फसवून जमिनी खरेदी केल्या व खोट्या बिगर कृषी सनदा मिळवल्या त्यामुळे ग्रामस्थाच्या बाजूने आपण असून २४ सप्टेंबर रोजी शासना विरोधात उग्र आंदोलन शेडण्याचा इशारा उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला. त्यांनी आज दोडामार्ग येथे पत्रकार परिषद घेत द ओरिजिन बाबत आपली भुमिका स्पष्ट केली.
दोडामार्ग तालुक्यात सासोलितील लोकांच्या सामाईक जमिनी काही ठरविक. लोकांकडून खरेदी केल्या मात्र याचे कुठेही धडे वाटप झाले नव्हते तरीही मोक्याच्या ठिकाणी “द ओरिजन” या कंपनीने जागा बळकावली आणि बांधकाम सुरु केले. याला स्थानिकांचा विरोध होता त्याला प्रशासन व आपले वैयक्तिक सुरक्षा रक्षक यांचेमार्फत हा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न झाला. लोकांनी प्रशासना विरोधात जातं जनआंदोलन केले त्यावेळी प्रशासनाने त्यांना न्याय देण्याचे सांगूनही आजपर्यंत म्हणजे जवळ जवळ १७ महिने उलटुनही न्याय मिळाला नाही त्यामुळे आपण लोकांसमवेत २४सप्टेंबर रोजी शासना विरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा संदेश पारकर यांनी दिला आहे.