You are currently viewing ए एस पी एम कॉलेज ऑफ फार्मसीला ए मूल्यांकन…

ए एस पी एम कॉलेज ऑफ फार्मसीला ए मूल्यांकन…

ए एस पी एम कॉलेज ऑफ फार्मसीला ए मूल्यांकन…

वैभववाडी

श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ए एस पी एम कॉलेज ऑफ फार्मसी, सांगुळवाडी ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग या महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्याकंन एवं प्रत्यायन परिषदेची (NAAC) A श्रेणी मिळाली. NAAC च्या माध्यमातुन उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाच्या गुणवत्तेचे मुल्याकंन तपासले जाते कुलुगुरु डॉ. रमेश मुधोळ, डॉ.निरू वासुदेव आणी डॉ. वाय पी रेड्डी या NAAC च्या तज्ञ समितीने ३० ऑगस्ट २०२४ व ३१ ऑगस्ट २०२४ रोजी ए एस पी एम कॉलेज ऑफ फार्मसी, सांगुळवाडी या महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन मागील पाच वर्षाची महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती व गुणवत्तेची पाहणी केली होती त्या पाहणीत नुकतेच गुणांक जाहीर केले त्यात महाविद्यालयास A ग्रेड मिळाला असून त्या मानांकनामुळे विद्यार्थ्यांना करीअर आणि उच्च शिक्षणाचा फायदा होईल तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय डॉ. वेदप्रकाश पाटील तसेच संदीप पाटील सर यांनी संस्थेचे प्राचार्य व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा