You are currently viewing देवगड कट्टा गावचे आरोग्य शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

देवगड कट्टा गावचे आरोग्य शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

*देवगड कट्टा गावचे आरोग्य शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*

देवगड

सिंधु ग्राम विकास फाऊंडेशनतर्फे आयोजित कट्ट्यावरील मोफत आरोग्य शिबिर ग्रामस्थांच्या जास्तीत जास्त उपस्थितीने पूर्ण झाले.
कट्टा गावातील खालचीवाडी, मधलीवाडी, ढोकेवाडी, वरचीवाडी व भंडारवाडी अर्थात गाबित व भंडारी याचे एकत्रित गाव तसेच सडेवाडी हा नंतर वस्ती झालेला विभाग.
या एकूण 1090 लोकसंख्या (फक्त गावात रहाणारे) असलेल्या गावात 20% लोक फक्त रक्तदाबाने पिडीत आहेत (आरोग्यकेंद्राच्या सर्व्हेनुसार) म्हणून सिंधु ग्राम विकास फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने हे मोफत भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले होते.
या आरोग्य शिबिरात डाॅ.प्रितेश साळवी, डाॅ.संघराज चव्हाण, डाॅ.प्रमोद डुमरे, डाॅ.अर्चना मर्गज, डाॅ.रेश्मा मुजावर असा डाॅक्टरांचा ताफा तसेच दिव्या आठवले – नेत्रचिकित्सा, रुपाली कोकम व सुचिता जोईल – लॅबटेक्निशियन्स, निलेश जोग – औषध वितरण, समिक्षा मुळीक – स्टाफ नर्स, रास पेटे व जोस्ना धुरी – आरोग्य सेविका व डि.जे.कांबळे अशा भव्य संचात उपस्थित होते. सोबत ईमर्जन्सीसाठी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आली होती.
विशेष म्हणजे या आरोग्य शिबिरात फिजिशिअनद्वारे तपासणी, महिलांचे आजार, रक्तदाब व डायबिटीस तपासणी, हृदयरोग चिकित्सा, ईसीजी, रक्त तपासणी, डोळे तपासणी व औषध वितरण अशा विविध विभागाची मांडणी आयोजकांनी शाळेच्या दोन्ही इमारतीमध्ये व्यवस्थित केली होती.
या शिबिरात डाॅक्टरांनी ग्रामस्थांची योग्य रितीने तपासणी करुन औषधांबरोबरच पुढील घ्याव्या लागणार्‍या दक्षतांचाही महत्त्वपूर्ण सल्ला दिला तसेच आयोजक सिंधु ग्राम विकास फाऊंडेशनचे सदस्यही पिडीतांना पुढील काळात सहकार्य कळणार आहे.
या शिबिरात तपासणीसाठी नऊ वर्षाच्या मुलांपासून ते ब्याण्णव वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्व वयाच्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.
डाॅक्टर्स, वैद्यकीय अधिकारी, टेक्निशियन व स्टाफचा स्मृतिचिन्ह देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
आयोजनात सुनिलदत्त करंगुटकर, डाॅ.कृष्णा बांदकर, सुधाकर सागवेकर, डाॅ.भाई बांदकर, अनिल शेडगे, शामकांत शेडगे, विलास शिरवडकर, निवृत्ती ढोके, अमोल कोयंडे, दिपक वा.कोयंडे, विनायक बांदकर यांनी अतोनात प्रयत्न करुन हे शिबिर यशस्वी केले.
असे आवश्यक व महत्त्वपूर्ण सेवाभावी कार्य संपूर्ण कोकणात करण्याचा संकल्प सिंधु ग्राम विकास फाऊंडेशनने केला आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा