You are currently viewing जिल्हातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार – जिल्हाधिकारी अनिल पाटील 

जिल्हातील पर्यटन वाढीसाठी पर्यटन महासंघास सहकार्य करणार – जिल्हाधिकारी अनिल पाटील 

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

सिंधुदुर्गनगरी :

 

पर्यटन व्यावसायिक महासंघ व टीटीडीएस संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांचे संम्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यटन महासंघाच्या वतीने जिल्ह्यात चालू असलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील अपरिचित पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे तसेच राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा स्वदेश दर्शन 2.0 या मध्ये समाविष्ट असून त्या माध्यमातून बीच टुरिझम बरोबर ऍग्रो,हिस्ट्री,मेडिकल,फॉरेस्ट,मँग्रोज,धार्मिक टुरिझम साठी सर्वसमावेश विकास आराखडा बनविण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी बोलताना श्री अनिल पाटील यांनी सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबीचा विचार करून जिह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार तसेच जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास ही सहकार्य करणार असे सांगीतले. अशी माहिती श्री विष्णु मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यानी दिली यावेळी श्री किशोर दाभोलकर सोशल मीडिया अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ,टी टी डी एस अध्यक्ष श्री सहदेव साळगावकर टीटीडीएस कार्याध्यश श्री रविंद्र खानविलकर पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर, श्री रामा चोपेड़ेकर ,श्री मिलिंद झाड़ श्री मनोज खोबरेकर,श्री दर्शन वैंगुर्लेकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा