You are currently viewing जागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ रोजी विविध उपक्रम.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ रोजी विविध उपक्रम.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त २७ रोजी विविध उपक्रम..*

सिंधुदुर्गनगरी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करणार आहे. युनायटेड नेशन टुरिझम (UN TOURISM) यांच्याद्वारे २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Them) -TOURISM & PEACE घोषित करण्यात आले आहे. जागतिक पर्यटन दिन केंद्रीय पर्यटन मंत्रालय, राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधून जागतिक पर्यटन दिनाच्या TOURISM & PEACE या घोषवाक्याशी अधीन राहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे संज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभाग प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक पर्यटन अधिकारी दीपक माने यांनी दिली.

जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिकांना, टुर्स ऑपरेटर्स, सहल आयोजक, टुर्स असोसिएटस, हॉटेलिअर्स, निवास न्याहरी इत्यादींच्या परिसंवादाचे आयोजन (सकाळी १० ते दुपारी १.३०) करण्यात येणार आहे. परिसंवादात प्रादेशिकस्तरावर महाराष्ट्र पर्यटन विभाग महामंडळाच्या पर्यटक निवासांचे नव्याने छापण्यात आलेल्या माहितीपत्रकांचे विमोचन करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयीनस्तरावर निबंध वः चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

निबंध स्पर्धेचे विषय-१. पर्यटन शांतता स्थापित करण्याचे एक साधन. २) पर्यटन व जागतिक शांतता,

३) महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश. ४) माझ्या स्वप्नातले पर्यटन ५) भारत व पर्यटन-शांततेचे दूत आणि प्रतिक या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह वितरित करण्यात येणार आहे. या पर्यटक निवासांमध्ये तीन दिवस राहण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

चित्रकला स्पर्धेचे विषय – १) समुद्र किनारा, २) कोकणातील ग्रामीण पर्यटन, ३) कोकणातील पारंपरिक मासेमारी, ४) कोकणातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ. स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रधान कार्यालयामार्फत प्रमाणपत्र व पारितोषिक स्वरुप प्रादेशिक कार्यालयामार्फत बक्षीस देण्यात येणार आहे. प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिक म्हणून प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह वितरित करण्यात येणार असून पर्यटक निवासामध्ये तीन दिवस राहण्याची संधीही उपलब्ध होणार आहे. पर्यटन विभागाच्या पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांकरिता पारंपरिक खेळांचे आयोजन, निवासानजीकच सुरक्षित पर्यावरणपूरक ठिकाणी ट्रॅक, जंगल ट्रेल, नेचर वॉक इत्यादींसह आणखी बरेच काही मनमुराद आनंद पर्यटकांना अनुभवता येणार आहेत. अधिक माहिती, नियम व अटी शर्तीसाठी संपर्क : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी (दूरध्वनी-०२३५२-२२१५०८/२२७९७७). महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक पर्यटन कार्यालय, सिंधुदुर्ग, राष्ट्रीय महामार्गालगत, सिंधुदुर्गनगरी, जि. सिंधुदुर्ग ४१६८१२ (दूरध्वनी – ९९२१२८२७३७),

प्रतिक्रिया व्यक्त करा