आरक्षण संपविणार म्हणारे कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा जाहीर निषेध
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात केलेल्या तरतुदी काँग्रेसला मान्य नसल्यामुळेच गांधींना आरक्षण नको
*भारतीय जनता पार्टी राहुल गांधी यांच्या विचारांचा करत आहे जाहीर निषेध
कणकवली
कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना भारतीय संविधानाच्या तरतुदी मान्य नाहीत.गरीब, मागास, दलीत,भटके,आदिवासी,ओबीसी,याचे आरक्षणच त्यांना मान्य नाही. म्हणूनच ते भारत देशातील आरक्ष काँग्रेसची सत्ता आल्यानंतर संपविणार असे जाहीर केले आहे. त्याच्या या विचारांचा आणि वृत्तीचा भारतीय जनता पार्टी जाहीर निषेध करत आहे.
कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना एका मुलाखती मध्ये कॉंग्रेस सत्तेवर आल्यानंतर भारत देशातील सर्वच प्रकारचे आरक्षण संपविणार आहोत असे जाहीर केले आहे. त्यांच्या विचारातून काँग्रेसला भारत देशातील अल्पसंख्यांक तसेच दलीत,आदिवासी, इतर मागास समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण मान्य नाही. देश महासत्ता होत असताना भारत देश जातीच्या आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून तोडण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू आहेत. या विचारांचा भारतीय जनता पार्टी जाहीर निषेध करत आहे.