You are currently viewing शिवसेना नेते तथा शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब आमचे आजही खासदार!,, शिवसेना पदाधिकारी!

शिवसेना नेते तथा शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब आमचे आजही खासदार!,, शिवसेना पदाधिकारी!

शिवसेना नेते तथा शिवसेना सचिव विनायक राऊत साहेब आमचे आजही खासदार!,, शिवसेना पदाधिकारी!

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या निवासस्थानी भजन, महीला फुगडी आणि कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू!

रत्नागिरी,राजापुर, देवगड आदी भागातुन येतात भजन मंडळे!

विनायक राऊत नेहमी प्रमाणे कायमच उठबस करण्यास व्यस्त!
गेली कित्येक वर्षे तळगाव या आपल्या निवासस्थानी मा खासदार विनायक राऊत दरवर्षी प्रमाणे पहील्या दीवसापासुन अकरा दिवस श्री गणराया सेवेत व्यस्त असतात, महाराष्ट्र राज्यातील शिवसेना सचिव या महत्त्वाच्या पदांवर नेते म्हणून उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख यांच्या सोबत निष्ठेने कामाची जबाबदारी स्विकारत असताना आपली निसिंम भक्ती गणरायाच्या चर्णी अर्पण करण्यासाठी दरवर्षी सेवा करीत आहेत,
खर तर गेल्या लोकसभा निवडणुकीत श्री राऊत यांचा पराभव झाला परंतु चेह-यावर नाराजीचा लवलेश न ठेवता आपल्या सोबत जनता जनार्दन आहेत तसेच देवतांचे आशिर्वाद आहेत, धनलक्ष्मी अचानक आल्याने काही थोडक्या मतांनी पराभव झाला याचा दोष शिवसेना पदाधिकारी आणि मतदारांना न देता मतदार संघात हद्दपार केलेली दहशत पुन्हा डोकं वर काढु लागली आहे परंतु लोकांच्या पाठीशी आणि मतदार संघात सतत संपर्कात राहून नाराज न होता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर निष्ठेने पक्षाचे काम सतत करत रहाणार अशी प्रतिक्रिया शिवसेना सचिव नेते मा खासदार विनायक राऊत यांनी दीली,
आज शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, रत्नागिरी,चिपळुण, राजापुर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची श्री राऊत यांना भेटण्यासाठी रीघ लागली होती यातच विनम्र पणे विचार पुस, करुन कार्यकर्त्यांच्या पाठीवर विश्वासाची थाप देऊन काम करण्याची उर्जा देत होते,
यावेळी श्री अतुल बंगे, युवा सेना तालुका प्रमुख योगेश धुरी, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, कुडाळ युवा सेनेचे राजु गवंडे, कुडाळ युवा सेनेचे अमित राणे, कुडाळ युवा सेना शहरं प्रमुख संदीप महाडेश्वर , युवा सेनेचे दीपक सावंत, युवा सेनेचे संदेश सावंत उपस्थित होते दरम्यान संपर्क प्रमुख सुरेश पाटील, युवा नेते सुशील चिंदरकर, युवा सेना कुडाळ उपतालुकाप्रमुख स्वप्नील शिंदे यांनी ही श्री राऊत यांची भेट घेतली,

प्रतिक्रिया व्यक्त करा