You are currently viewing समजून कोण घेतो..?

समजून कोण घेतो..?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी शशांक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*समजून कोण घेतो..?*

 

कोणास लोभ भारी

कोणास क्षोभ भारी…

अर्थास माणसाच्या

समजून कोण घेतो..?

 

पोटास काय? लागे

वेळेस दोन जेवण…

जाणून सत्य सुद्धा

समजून कोण घेतो..?

 

करतो किती जिवाचा

माणूस तडफडा पण…

सुख ते निकट तयाला

समजून कोण घेतो..?

 

लोभात नुस्त जीवन

जाते सरून अपुले…

जगणे कसे तरीही

समजून कोण घेतो..?

 

येत्या अशा जिवाला

जाणे अवश्य येथे…

मृत्यूस आपल्या ते

टाळून कोण येतो..?

 

आहोत पाहुणे ते

दिस चार, जीव आपण…

साक्षात सत्य शाश्वत

समजून कोण घेतो..?

 

✍️शशांक दिनकरराव देशमुख©®

चांदुरबाजार, जि. अमरावती

(महाराष्ट्र राज्य) – ४४४ ७०४

मो. क्र. ९९२३५३६३२५

प्रतिक्रिया व्यक्त करा