बेकायदेशीर व विनापरवाना दारु वाहतुक करत असलेल्या गुन्ह्यातुन “संशयीताची निर्दोष मुक्तता.
कुडाळ
दिनांक २८/०४/२०२३ रोजी रात्री १०.०० वा मौजे पणदुर येथे मुंबई गोवा महामार्ग ब्रिजवर सफेद रंगाची सिझुकी कंपनीची SML चारचाकी वाहन क्रमांक MH ०७ AG ६३४५ मधुन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ७० पुढ्याचे गोल्ड अॅण्ड ब्लॅक गोवा बनावटीची ७५० मीली मापाच्या १२ बाटल्या किंमती रुपये ३,३६,०००/- तसेच २० पुढ्याचे बॉक्स १८० मीली मापाच्या बाटल्या किंमती रुपये ९६,०००/- तसेच मॅकडॉल नंबर १चे ५ बॉक्स किंमत अंदाजे ४८,०००/- दारुबंदी गुन्ह्याचा मुद्ददेमाल बेकायदेशीर रित्या आरोपी गौरव संभाजी कवटकर वय २८ वर्षे, मु. पो. नेरुर देऊळवाडा, ता. कुडाळ यांच्या ताब्यात मिळुन आला म्हणुन त्याच्या वर महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम कलम ६५ अ व ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर कामी सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले परंतु आरोपी तर्फे वकील श्री. अॅड. अशपाक शेख यांच्यातर्फे असा युक्तीवार करण्यात आला की, सदरचा पंचनामा हा शबिद झालेला नसुन साक्षीदार यांच्या साक्षीतील विसंगती ही युक्तीवाद ग्राह्य मानुन अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग ओरोस श्री. ए.डी. तिडके यांनी आरोपीची संशयाचा फायदा घेवुन निर्दोष मुक्तता केलेली आहे. आरोपी तर्फे अॅड. अशपाक शेख यांनी काम पाहिले.