You are currently viewing मोफत आरोग्य शिबिराचे 13 सप्टेंबर ला आयोजन

मोफत आरोग्य शिबिराचे 13 सप्टेंबर ला आयोजन

मोफत आरोग्य शिबिराचे 13 सप्टेंबर ला देवगडात आयोजन

देवगड

कट्टा गावातील आरोग्यकेंद्राच्या सर्व्हेनुसार फक्त कट्टा गावातच *रक्तदाबाचे 193 पेशंट आहेत* त्यातीलच काही डायबिटीसवालेही आहेत, हृदय शस्त्रक्रिया झालेले आहेत. ही समस्या कट्टा गावातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर असेल तर पंचक्रोशीतील किती असेल?
यावरच काही प्रमाणात सोल्युशन काढण्यासाठी *सिंधु ग्राम विकास फाऊंडेशन* या नुकत्याच स्थापन झालेल्या रजिस्टर्ड सेवाभावी संस्थेतर्फे कट्टा गाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थाकरीता *मोफत आरोग्य शिबिराचे* शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते सायं. 4 वाजेपर्यंत असे आयोजन केले आहे. या शिबिरात जनरल चेकअप व औषधोपचार, रक्ततपासणी, रक्तदाब व डायबिटीस चिकीत्सा, नेत्र तपासणी (चष्मा, मोतीबिंदू,काचबिंदू), ऑर्थोपेडीक, महिलांचे आजार (गायनॅकॉलॉजिस्ट) ई. तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
हे शिबिर गणपती उत्सवातच घेण्याचे कारण यावेळी घरचा कर्ता चाकरमानी (जो कामानिमित्त शहरात असतो ) गावी आपल्या घरी आलेला असतो त्याच्या समोरच या तपासण्या झाल्या आणि पुढील ट्रिटमेंटसाठी तज्ज्ञांकडून सुचविले गेले तर ही मंडळी लगेच निर्णय घेवू शकतात.
*या शिबिरात तपासणीकरीता येणाऱ्या प्रत्येक कुटुंबास 5 लाखाची कुटुंब अपघात पाॅलिसी मोफत दिली जाणार आहे.*
तसेच कट्टा गावातील विठ्ठल मंदिर ते शिबिरस्थळी आणण्या-नेण्याची व्यवस्था *विनाशुल्क* असेल.
या शिबिराचे नियोजन *सिंधु ग्राम विकास फाऊंडेशनचे* अध्यक्ष श्री.सुनिलदत्त करंगुटकर, उपाध्यक्ष डाॅ.कृष्णा बांदकर, खजिनदार श्री.सुधाकर सागवेकर, कार्याध्यक्ष डाॅ.भाई बांदकर आणि सन्मानीत सदस्य श्री.मनोहर कोयंडे, श्री.अनिल शेडगे, श्री.दिपक सो. कोयंडे, श्री.शामकांत शेडगे, श्री.दयानंद शेडगे, श्री.विलास शिरवडकर तसेच सन्मानीत श्री.निवृत्ती ढोके, श्री.भगवान कोयंडे, श्री.नागेश कडू, श्री.विनायक बांदकर, श्री.अमोल कोयंडे, श्री.दिपक वा.कोयंडे यांनी केले आहे.
*या शिबिरात कट्टा, कालवी ते मोंड-वानिवडे व पिरवाडी ते आनंदवाडी व इतर परिसरातील नागरिकांनी येवून आरोग्य लाभ घ्यावा असे आयोजकातर्फे आवाहन करण्यात येत आहे*

______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा