*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझं चिंचेचं झाडं…..!!*
मीच माझ्या मातीत
गर्भार चिंचोके पेरतो
कधीतरी होते माझे
बालमनं फुलाया लावतो…!
पानडी चिंचेची भुरभुर
वा-यावर उडत डोक्यावर
पोरके शब्दही आंबले
लालपिवळी पालवी जीभेवर..!
पांढरट गुलाबी शंकू
कळ्या हळूचं डोकावती
पहाटेचा डोह मोकळा
कळ्या फुलू लागती…!
छोटुकली चिंचेची फुलं
सोनेरी उन्हांत चमकायची
चवही दाटून येते
मुखी जादू करायची..!
हिरव्या लाटांचा सोहळ्यांत
चिंचेचं दर्शन व्हायचं
कान्हा वेळू फुंकायचा
आनंदाच बीज रूजायचं..!
कांबळं लालमुंग्याच पांघरून
चिंचेचं झाडं डवरायचं
पोपट!साळुंक्या कुशीत
भावखुणा अंतर्यामी जपायचं..!
बाळपाखरांची सृजनाची भाषा
चिंचेनं आजवर जपली
वृक्षसन्मुख नवजात बाळं
अधरावर आंबटगोड गुणगुणली..!
माझं चिंचेचं झाडं
गात नाही किलबिलतं
छकुल्या बोटांच्या पाकळ्या
मुखानं चाटतं बसतं..
बाबा ठाकूर धन्यवाद
माझ्या अग्निशलाकातून…