You are currently viewing विटंबना माझी करू नका

विटंबना माझी करू नका

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*विटंबना माझी करू नका* 

 

आगमन माझे झाले

मी तुमच्या घरी आलो

पुन्हा भेटून तुम्हाला

लयी आंनदीत झालो

खरचं वाजतगाजत आणून

पुजा माझी करतात

विधीवत स्थापना करून

आरती दोन्ही वेळा म्हणतात

 

पाहुणा म्हणून मी तुमच्या घरी येतो

दहा दिवस विश्रांती घेऊन

रोज लाडू मोदक खातो

व्यथा वेदना दुःख विसरून

तुंम्ही सेवा माझी करतात

निरोप देताना गहिवरून जातात

 

तुम्हाला सोडून तर

मलाही जावस वाटत नाही

तुमच्याशिवाय मला

जराही करमतं नाही

वाजतगाजत नाचत तुम्ही

मिरवणूक माझी काढतात

नदी तलाव धरणात

विसर्जन माझं करतात

कोणी श्रध्देने पाण्यात बुडवतो

तर कोणी अक्षरशःफेकून देतो

खरचं तुम्ही माझे भक्त आहात का

प्रश्न मला तेव्हा पडतो

 

तुकडे तुकडे होतात माझे तरी

मी कुणाला काहीच त्रास देत नाही

दहा दिवसाचं सत्व वाया जाते तरी

मी कुणाच वाईट करत नाही

नशेत तुम्ही नाचतात

मी सारं काही बघतं असतो

तेव्हा मात्र माणसा माणसात मला

मी कुठेच दिसत नसतो

 

तुम्ही कसेही वागलात तरी

मी तुमच्यासाठी येतचं राहणार

दहा दिवस तुमच्या घरी

मनसोक्त विश्रांती घेणार

विनंती मात्र एकच की

मी तुमचा सुखकर्ता दुःखहर्ता

विटंबना माझी करू नका

तुमच्या भावभक्ती श्रध्देला

जराही तडा देऊ नका

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९४२२८९२६१८

९५७९११३५४७

प्रतिक्रिया व्यक्त करा