You are currently viewing बाळा गावडे यांनी घेतले पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी बाप्पांचे दर्शन

बाळा गावडे यांनी घेतले पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी बाप्पांचे दर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी भेट देत, त्यांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतले.
पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद बांधकाम सभापती असताना ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी आपुलकीच्या नात्याने सुसंवाद साधणारे, बाळा गावडे गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्यांच्या घरी पोचतात तेव्हा *आमचो बाळा इलो* असे उद्गार काढत कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील सदस्यही मालवणी भाषेत बाळा गावडे यांच्याशी आपुलकीच्या नात्याने संवाद साधत होते.

 

*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनी आज सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले….*

प्रतिक्रिया व्यक्त करा