You are currently viewing सावंतवाडीत दीड दिवसांच्या गणरायाला निरोप…

सावंतवाडीत दीड दिवसांच्या गणरायाला निरोप…

सावंतवाडीत दीड दिवसांच्या गणरायाला निरोप…

सावंतवाडी

शहरात दीड दिवसांच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावानं निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व फटाक्यांच्या आतषबाजीने गणरायाचे विसर्जन करण्यात आले. ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या लाल राज गणपतींनाही राजघराण्याच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते.

कोकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीला शनिवारी प्रारंभ झाला. पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून घरोघरी श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. नातेवाईक, पाहुणे मंडळींनी एकमेकांच्या घरी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. आरती, भजन, भक्तिमय गीतांच्या आवाजाने सर्वत्र भक्तिमय व चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. महिलांच्या फुगड्याही विशेष लक्षवेधी ठरल्या. शनिवार सायंकाळी 6 वाजल्यापासून दीड दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकांस प्रारंभ झाला. विधिवत उत्तरपूजा करून मूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आली. विसर्जनस्थळी मोती तलाव येथे नगरपरिषदेच्यावतीन खास आयोजन करण्यात आलं होतं. पोलिसांचा ही कडक बंदोबस्त होता. शहरात अनेक ठिकाणी पाच, सात, अकरा दिवस तर 21 दिवसांच्या तीन मानाच्या गणपतींचा सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्यात येत आहे. दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले. सावंतवाडीच्या ऐतिहासिक राजघराण्याच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर शहरातील इतर गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

ऐतिहासिक राजघराण्यातील दीड दिवसांच्या गणपतीच विसर्जन मोती तलाव येथे करण्यात आलं. युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, राजकन्या उर्वशीराजे भोंसले यांच्या उपस्थितीत मंगलमुर्तीची राजवाडा येथून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. राजवाडा व ऐतिहासिक माठ्यातील दोन्ही गणपतींचं राजघराण्याकडून एकत्रित विसर्जन करण्यात आलं.शहरातील गणरायांचे विसर्जन ऐतिहासिक मोती तलावात केलं जातं. गणेशभक्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यंदाही चोख व्यवस्था केली. लाडक्या गणरायाला उत्साहात निरोप देता यावा यासाठी विसर्जनस्थळी मंत्री केसरकर यांच्या संकल्पनेतून पुष्पवृष्टी करण्यात आली. यामुळे तलावाच्या विसर्जन स्थळांना वेगळा लूक आला होता. पुष्पवृष्टी नंतर लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा