You are currently viewing असा भक्तीत जागते

असा भक्तीत जागते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री सरिता परसोडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*असा भक्तीत जागते*

 

मोठा नको छोटा आण

बाबा गणपती एक

जसा खेळे मांडीवर

माझ्या आईचा मी लेक..

 

छोटे छोटे पाय त्याचे

थोडे मला चेपू देना

नको आणू पालखित

तुझा नको त्याला मेना…

 

बसायला हवा त्याला

फक्त छोटासाच पाट

त्याच्यासंगे शोभत तो

त्याच्या वाहनाचा थाट..

 

कसा शोभून दिसतो

लाल जास्वंदी फुलात

संगे रिद्धी सिद्धी शोभे

कशा मखमली झुल्यात..

 

आता पुढ्यात ठेवतो

फक्त छोटेशे तबक

नैवेद्याला बर्फी पेढा

नको ऐकवीस मोदक..

 

किती राबते गं आई

माझ्या गणू बाप्पासाठी

साऱ्या संकटी रक्षीतो

सदा राही तुझ्या पाठी..

 

आता एकच मागणे

आई देवाला मागतो

दावी चरण तुझे गं

तुझ्या चरणी लागतो

 

शंभू पार्वतीची जोडी

माझ्या घरात नांदते

म्हणूनिया त्यांचा गणू

असा भक्तीत जागते..

 

सौ सरिता परसोडकर ✍🏻

प्रतिक्रिया व्यक्त करा