You are currently viewing गणरायाची आरती

गणरायाची आरती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गणराज आरती*

 

*।।गणरायाची आरती।।*

 

जय देव जय देव, जय जय गणराया।

भक्त झाले गोळा, तव आरती कराया।।धृ।।

 

देवा सर्व सुखाचा, असशी तू दाता।

नमितो मनोभावे, चरणी ठेवतो माथा।।

असो तुझी कृपा, नित्य आम्हावर देवा।

द्यावी शुद्धि बुद्धी, तुजला स्मराया।।१।।

 

दुःख सारे हरती, पाहता तुझी मूर्ती।

श्रद्धेने पूजिता, सारे संकट सरती।।

तुझ्या पूजनाचा, उत्सव हा देवा।

दहा ही दिवशी घडो, उत्तम सेवा।।२।।

 

सर्वांग सुंदर रूप, मनोहारी किती।

हे गणाधिशा, तुमची करतो आरती।।

अखंड कृपा असो, आशीर्वाद द्यावा।

जयराम वंदितो, गोड मानावी सेवा।।३।।

 

जय देव जय देव, जय जय गणराया।

भक्त झाले गोळा, तव आरती कराया।।धृ।।

 

जयराम धोंगडे, नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा