*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गुरु एक शिल्पकार*
प्रकाशच ज्ञानगुरु
देई शिष्यास आकार
पैलू पाडतो जीवना
गुरु एक शिल्पकार
आहे अथांग सागर
वाट ज्ञानाची दाखवी
पाझरुन शिक्षणात
मुल्ये तत्वाची फुलवी
काश यशाची दिसते
सदा गुरूंच्या छायेत
वाट मिळे शिक्षणात
त्यांच्या शिक्षण कलेत
शिक्षा सत्याची देताना
सदा ज्ञानबोध येई
गुरु माझे कल्पतरु
विकासाच्या गावी नेई
गुरू प्रकाशित सूर्य
ज्ञान धडे गिरवतो
जीवनाच्या वाटेवर
ज्ञान फुले फुलवतो
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक
स्वरचित काव्य लेखन