You are currently viewing गेल्या 11 महिन्यात 2270 शेतकऱ्यांच्या आत्महत्या…

गेल्या 11 महिन्यात 2270 शेतकऱ्यांच्या आत्महत्या…

त्यापैकी फक्त 920 शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान

मुंबई 

शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच बऱ्याच योजनेनंतर सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झालेली नाही. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार 1 जानेवारी 2010 ते 31 नोव्हेंबर 2020 या काळात म्हणजेच मागच्या 11 महिन्यात एकूण 2270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी फक्त 920 शेतकऱ्यांना रुपये एक लाख महाराष्ट्र सरकारकडून अनुदान मिळालेले आहेत.

2019 मध्ये 2808 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यापैकी 1578 शेतकरी कुटुंबांना एक लाख रुपये अनुदान सरकारकडून देण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या आहेत.

सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना अनुदान नाकारण्यात आलेला आहे. एकूण 990 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यात फक्त 348 शेतकरी कुटुंबांना अनुदान मिळाले तर तब्बल 411 शेतकरी कुटुंबांना अनुदान नाकारण्यात आलेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा