मालवण :
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांचा सत्कार समारंभ मालवण दिवाणी न्यायालयाचे सन्मा. न्यायाधीश श्री. देवकते यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच तालुका अध्यक्ष सतीशकुमार धामापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मालवण तालुका वकील संघटनेच्या वतीने सर्वप्रथम मालवण तालुका न्यायालय येथे आयोजित केला.
माझ्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील तुम्ही सर्व वकील माझ्या पाठीशी ठाम राहिलात, तुम्हा सर्वांमुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान मला मिळाला. तुमच्या सर्वांची मान अभिमानाने ताठ राहील असे आदर्शवत काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. मुंबईत अत्याधुनिक सुविधा असलेले भवन उभारणी, मालवणसह अनेक न्यायालयांचा नवीन इमारती बांधकाम तसेच वकील संघटनांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर राहीन, आज सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक वकील अध्यक्ष बनला आहे”, अशा भावना बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांनी व्यक्त केल्या.