जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत 27 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक पर्यटन दिन 2024 साजरा करत असून, युनाटेड नेशन दुरिझम (UN TOURISM) यांच्याव्दारे सन-2024 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Them) -TOURISM & PEACE घोषित करण्यात आले आहे. जागतिक पर्यटन दिन पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याव्दारे विविध उपक्रमांतून साजरा केला जात आहे. या दिनाचे औचित्य साधत जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Them) -TOURISM & PEACE या घोषवाक्याशी अधीन राहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाव्दारे संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रमाव्दारे राबविण्यात येणार असल्याची माहिती कोकण विभाग प्रादेशिक कार्यालय प्रादेशिक पर्यटन अधिकारी दिपक माने यांनी दिली आहे.
जागतिक पर्यटन दिनानिमित्त परिसंवाद (MTDC World Tourism Day Serminar)
जिल्ह्यातील नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिकांना, टूर्स ऑपरेटर्स, सहल आयोजक, टूर्स असोसिएटस, हॉटेलिअर्स, निवास न्याहरी इ. यांचे परिसंवादाचे आयोजन (सकाळी 10.00 ते दु. 1.30) करण्यात येणार आहे. परिसंवादामध्ये प्रादेशिक स्तरावर मान्यवरांच्या हस्ते मपविमच्या पर्यटक निवासांचे नव्याने छापण्यात आलेल्या माहितीपत्रकांचे विमोचन करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
निबंध स्पर्धेचे विषय:- 1. पर्यटन शांतता स्थापित करण्याचे एक साधन. 2) पर्यटन व जागतिक शांतता, 3) महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश.4) माझ्या स्वप्नातले पर्यटन 5) भारत व पर्यटन- शाततेचे दूत आणि प्रतिक या स्पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्याना पारितोषिक स्वरुपामध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह वितरित करण्यात येणार असून मपविमच्या पर्यटक निवासामध्ये 3 दिवस राहण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे.
चित्रकला स्पर्धेचे विषय:- 1) आवस्ता समुद्रकिनारा 2) कोकणातील ग्रामीण पर्यटन 3) कोकणातील पारपारिक मासेमारी 4) कोकणातील प्रसिध्द धार्मिक स्थळ या स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रधान कार्यालयामार्फत प्रमाणपत्र व पारितोषिक स्वरूप प्रादेशिक कार्यालयामार्फत बक्षिस देण्यात येणार आहे. तसेच प्रथम, व्दितीय व तृतीय विजेत्याना पारितोषिक स्वरुपामाध्ये प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह वितरित करण्यात येणार असून, मपविमच्या पर्यटक निवासामध्ये 3 दिवस राहण्याची संधी देखील उपलब्ध होणार आहे.
तसेच मपविम पर्यटक निवासांमध्ये वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांकरिता पारंपारिक खेळांचे आयोजन, निवासा नजीकचं सुरक्षित पर्यावरणपूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नेचर वॉक, इ. सह आणखी चरंच काही मनमुराद आनंद पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
अधिक माहिती व नियम व अटी शर्ती साठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय रत्नागिरी, जिल्हाधिकारी कार्यालय आवार. नवीन प्रशासकीय इमारत, विग, पहिला मजला, जयस्तंग, रत्नागिरी – 4156-2 (दुरध्वनी – 02352-221508/227977). महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक पर्यटन कार्यालय, सिंधुदुर्ग, राष्ट्रीय महामार्गालगत, सिंधुदुर्ग नगरी, जि. सिंधुदुर्ग 416812 (दुरध्वनी – 9921282737) येथे संपर्क करा.