You are currently viewing घरकुल कन्स्ट्रक्शनचे दिनेश नागवेकर यांना कॅलिफोर्निया युनिर्व्हसिटीची डॉक्टरेट

घरकुल कन्स्ट्रक्शनचे दिनेश नागवेकर यांना कॅलिफोर्निया युनिर्व्हसिटीची डॉक्टरेट

सावंतवाडी :

 

सावंतवाडीतील राणी पार्वतीदेवी ज्युनियर कॉलेज, सिव्हिल इंजीनियरिंगचे निवृत्त शिक्षक, इंजिनियर, बिल्डर्स दिनेश नागवेकर यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीने आर्किटेक्चर मध्ये डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देऊन गौरव केला आहे. दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीच्या पब्लिक रिलेशन विभागाचे प्रमुख डॉक्टर रघुनाथ पाराक्कल आणि राजस्थानच्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे उपकूलपती आणि भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाचे सल्लागार डॉक्टर के. एस. राना यांच्या हस्ते पदवी देऊन नागवेकर यांना गौरविण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा