You are currently viewing हरितालिका तृतीया

हरितालिका तृतीया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*हरितालिका तृतीया..*

 

वधूवरांच्या जोड्या

नशीबाने ठरतात,

देवादिक स्वर्गातून

लग्नगाठ मारतात..।

 

शिव पार्वतीचे प्रेम

एकमेका सांगतात,

हरितालिकेच्या व्रता

इच्छित ते मागतात..।

 

जप तप केले तर

पुण्य पती रूप घेते,

मनामध्ये असेल तो

पती बनोनीया येते..।

 

याच साठी असते हे

व्रत हरितालिकेचे,

दिवस पुण्यवान हे

व्रतांच्या मालिकेचे..।

 

 

 

✍🏻 *अख़्तर पठाण.*

*(नासिक रोड)*

*मो.:- 9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा