You are currently viewing गुलाबसम्राट

गुलाबसम्राट

*ज्येष्ठ कवी गझलकार मकरंद घाणेकर यांची गुलाब सम्राट बाबा ठाकूर यांची स्तुती करणारी अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाबसम्राट*

 

गुलाबसम्राट गुलाबसम्राट

उत्साह तर इतका अफाट

झोपेत रात्री वाटत असेल

कधी एकदा होते पहाट

 

नाजूक साजूक फुलांना

मुलांसारखे वाढवायचे

जमेल तितके ह्रदय ओतून

त्यांचे संगोपन करायचे

 

गुलाब काय बोलेल जेव्हा

काटेदेखील मऊ पडले

काटे म्हणतात आम्ही देखील

गुलाब इतके नाही जपले

 

आमच्या घरात रोज येतो

जगभर सौदर्य लुटतो

गुलाबसम्राटाचा गुलाब

तुमचा आमचा होऊन जातो

 

“चिरतरुण” गुलाबसम्राट

गुलाबाशी नाते जपतो

गुलाबाला सम्राटाला

शब्दांनीच सलाम करतो

 

===============

मकरंद घाणेकर, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा