*मंत्री केसरकर यांच्याकडून गणेशभक्तांना धान्य वाटप*
▪️ *दोडामार्ग तालुक्यातील गावागावांत वाटप*
दोडामार्ग
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्यावतीने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात गणेशभक्तांना धान्य वाटप करण्यात आले आहे. अधिकाधिक गावांत वाटप झाले असून अजून काही गावात वाटप करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
गणेशभक्तांकडून याबाबत समाधानाचे सूर असून याही पुढे सर्वसामान्य जनतेसाठी कार्य अखंडीत सुरु राहील असे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले. तालुक्याच्या ठिकाणी प्रतिनिधीक स्वरूपात धान्य वाटप कार्यक्रमावेळी जिल्हा समन्व्यक शैलेश दळवी, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजू निंबाळकर यांसह गोपाळ गवस, योगेश महाले, भगवान गवस, दादा देसाई, रामदास मेस्त्री, मायकल लोबो, तिलकांचन गवस, तुकाराम बर्डे, आपा गवस, अनिल शेटकर, प्रवीण गवस, संतोष शेटवे आदी उपस्थित होते.
फोटो – गावागावांत स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्याकडून सुरु असलेले धान्यवाटप