You are currently viewing द्रौपदी, एक प्रश्र्न तुला

द्रौपदी, एक प्रश्र्न तुला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*द्रौपदी, एक प्रश्र्न तुला*

॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰

पांचाळ नरेशांची सुपुत्री तू

एक क्षत्रिय राजकन्या तूं।

राजा द्रुपदाची कन्या, द्रौपदी तूं

कृष्णा तूं क्षात्राणी तू।

तुला शिकविला क्षात्र धर्म

तुला शिकविले शस्त्र-अस्र।

क्षत्रीय कन्या म्हणून धर्म शिकविला

पत्नी म्हणून कर्तव्य शिकविले।

समोर पाच पती शूरवीर म्हणून मिरवणारे

खाली मान घालून बसलेले

द्यूत खेळून तुला पणास लावणारा पती

बंधुधर्म पाळणारे,पत्नीधर्मास न जागणारे

वस्त्रहरणास विरोध न करणारे

क्षात्रधर्म पाळून अधर्माविरुद्ध

का नाही लढलीस तूं

द्रौपदी एकच प्रश्न आहे माझा तुला

का नाही शस्त्र धरलेस हाती तू

पतीच नव्हते तुझे तुजप्रती धर्म पाळणारे

भीष्म द्रोण तर अधर्म्यांच्याच पक्षातले

पत्नीस पणाला लावणाऱ्या पतींबरोबर

का वनवासात गेलीस तू

एकच प्रश्न माझा तुला का

स्वसंरक्षणार्थ शस्त्र हाती नाही घेतलेस तू

द्रौपदी हा प्रश्न सतावतोय गं मला!

 

विद्या रानडे

प्रतिक्रिया व्यक्त करा