You are currently viewing कशास उगळावे पाढे

कशास उगळावे पाढे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कशास उगळावे पाढे*

 

कशाला उगळावे पाढे

भूतकाळात जे गाडले

विसरावे सारे क्लेश

घाव त्यांचे मिटले…..

 

पुढे पुढे चालताना

मार्ग यशाचा गवसतो

उगाळू नये जुन्या घटना

प्रगतीचा अवरोध होतो…

 

जागृत ठेवावे आत्मभान

मिळते प्रकाशाची दिशा

मनात ठेवावी सदोदित

जिद्द आणि आकांक्षा…

 

झाले गेले विसरून

मनाच्या को-या पाटीवर

लिहावे पुन्हा नव्याने

आयुष्याचे सुरेख अक्षर..।।

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा