You are currently viewing स्नेहाचा पोळा

स्नेहाचा पोळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. स्मिता श्रीकांत रेखडे लिखित अप्रतिम काव्यरचना.*

 

🌷🌷 स्नेहाचा पोळा 🌷🌷

 

शेतपिकांतून उगवती माणिक मोती

कष्टातुनी फुलवती समृध्दी चा मळा

कृतज्ञता ही भावभावनेतुनी जपती

आदरपूर्वक करतो साजरा बैलपोळा ||१||

 

संस्कारातून गुंफिते नाते सुखद हळुवार

पुरणपोळी सह घास भरितो लडिवाळ

धन्याप्रति मुक भावना जागते अलवार

लहानथोर ही करिती ममतेने प्रतिपाळ ||२||

 

मारबतीतून करिता दुष्प्रवृतीचा विनाश

परंपरा जपण्या सकल जन होई गोळा

तनामनातून पुलकित अंतरीचा श्वास

काष्ठातुन प्रतिमा साजरा तान्हा पोळा ||३||

 

मातृत्वाचा गौरवाप्रति प्रकटती भावना

अतिथी कोण पुसे माय दाटुनी प्रेम गळा

समईची ज्योत उजळी सुमधुर नात्यांना

प्राणीमात्रांना जोपासून साजरा होई पोळा ||४||

 

वाट बघती चिमुकली सजवुनी बैल लाकडी

सांगता होई जल्लोषात फुटता बैल पोळा

औक्षवणानी भगिनी फोडी काकडी बंधू पाठी

वृध्दिगंत होई सुंदर नात्यांचा हो स्नेहमेळा ||५||

 

सौ. स्मिता श्रीकांत रेखडे.नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा