You are currently viewing गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भजन मंडळांना भजन साहित्य वाटप..

गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भजन मंडळांना भजन साहित्य वाटप..

सावंतवाडी :

 

राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तिन्ही तालुक्यात प्रत्येक गावागावात जवळपास साडेसातशे भजन मंडळांना पखवाज तबला व चार टाळ असे भजन साहित्य चे वाटप सावंतवाडी करण्यात आले. सावंतवाडी तालुक्यातील सुमारे २०० भजन मंडळांना हे साहित्य वाटप करण्यात आले. उर्वरित वेंगुर्ले, दोडामार या दोन तालुक्यांचे वाटप दोन दिवसात केले जाणार आहे.असे दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी स्पष्ट केले.

श्री केसरकर यांनी गेल्या महिन्याभरापूर्वी गावतील भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप करण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी तिन्ही तालुक्यातील सुमारे साडेसातशे भजनी मंडळांना हे साहित्य वाटप सुरू केले आहे. सावंतवाडी तालुक्यात दोनशे भजन मंडळांना काजी शहाबुद्दीन हॉल येथे तबला पखवाज व टाळ असे भजन साहित्य वाटप कार्यक्रम करण्यात आले. यावेळी सहा जिल्हा परिषद मतदार संघ निहाय गाव नुसार भजनी मंडळाने हे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी तालुकाप्रमुख नारायण राणे विनायक उर्फ अब्जू सावंत. अभय किनरोस्कर. श्यामसुंदर उर्फ बाळा गावडे, श्री मेस्त्री, निरवडे उपसरपंच श्री पेडणेकर श्री गावकर, बाळा शिरसाट सुरज परब आधी उपस्थित होते. यावेळी माडखोल, माजगाव, इन्सुली, बांदा, कोलगाव, मळेवाड या सर्व जिल्हा परिषद मतदार संघ निहाय भजन साहित्याचे वाटप काल मंगळवारी करण्यात आले. शिवसेनेच्या वतीने मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हे भजन साहित्य वाटप करण्यात आले आहे.

श्री केसरकर यांनी यापूर्वी आपल्या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये सर्वांना बाजा पेटी आणि भजन साहित्य चे वाटप केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी हे भजन साहित्य वाटप करून गणेश चतुर्थीची भेट भजनी मंडळांना दिली आहे. त्यामुळे भजनी मंडळाकडून समाधान व्यक्त होत आहे. भजन साहित्य घेण्यासाठी गावागावातून भजनी मंडळाचे पदाधिकारी यांनी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत भजन साहित्य वाटप करण्यात येत होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा