You are currently viewing वचनपूर्तीचा आनंददायी दिवस..

वचनपूर्तीचा आनंददायी दिवस..

वचनपूर्तीचा आनंददायी दिवस – विजय केनवडेकर
जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग

मा.रवींद्र जी चव्हाण ….
6 नोव्हेंबर 2022 रोजी जम्मू-काश्मीर येथे जगातील सर्वात उंच चिनाब नदीवरील रेल्वे पुल या ठिकाणी कोकण रेल्वेच्या सल्लागार समितीची सभा आयोजित केली होती. या सभेला महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार मा.विनायक राऊत, चिपळूणचे आमदार मा. शेखर निकम, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चा प्रतिनिधी म्हणून मी विजय केनवडेकर, कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मा.सचिन वहाळकर रत्नागिरी हे उपस्थित होतो.
सभेला सुरुवात झाली दर वेळेप्रमाणे कोकणातील प्रश्नाबाबत विचारणा सुरू झाली. कोकण रेल्वेच्या रेल्वे स्थानकाकडे जाणारे सर्व रस्ते सुस्थितीत नाही ते दुरुस्त करणे फार आवश्यक आहे असा विषय माजी खासदार विनायक राऊत मी व सचिन वहाळकर यांनी मांडला. कोकण रेल्वेचे एम.डी मा.संजय गुप्ता यांनी त्याला उत्तर दिले.
कोकण रेल्वे कडे निधी उपलब्ध नसल्यामुळे रस्ते दुरुस्त करण्यास विलंब होत आहे. ज्याप्रमाणे गोवा कर्नाटक राज्याने रस्ते दुरुस्तीसाठी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला तसा महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. स्थानिक खासदार फंड उपलब्ध करून द्यावा.अशी विनंती केली.
त्यावर खासदार साहेब म्हणाले असा निधी महाराष्ट्रातून मिळणे शक्य नाही.तुम्ही सिंधुदुर्ग नगरी स्टेशन कडे जाणारा रस्ता कोकण रेल्वेच्या निधीतून करावा अशी विनंती केली.
त्यावर मी व वहाळकर यांनी असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही दिला आहे का ? त्याचे उत्तर नाही आले. त्यावेळी असा निधी मिळू शकत नाही. आमचे सरकार, आमचे मुख्यमंत्री असतानाही मी प्रयत्न केले पण अशा प्रकारचा निधी उपलब्ध होऊ शकत नाही असे ठाम मत खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.
आता आमचे कोकणाचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.रविंद्रजी चव्हाण साहेब आहेत. त्यांच्याकडे असा प्रस्ताव ठेवल्यास मार्ग 100% येऊ शकतो. असा विश्वास मी वहाळकर यांनी मांडला. त्याला आमदार मा.शेखर निकम यांनी पाठिंबा दिला. या विषयावर शाब्दिक वादावादी पण झाली. मी व सचिन वहाळकर यांनी चिनाफ प्रकल्पावरूनच मा. रवींद्रजी चव्हाण यांना फोन लावला. कोकणातील रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यांना निधी उपलब्ध होऊ शकतो का? असे विचारणे केले असता मला मुंबईला येऊन भेटा असे सांगण्यात आले.
8 नोव्हेंबर 2022 रोजी मी व सचिन वहाळकर, मा.रविंद्रजी चव्हाण यांना मुंबई येथे भेटून या संदर्भातले निवेदन दिले. याला किती निधी लागेल ? ते आम्हाला सांगता आले नाही म्हणून आम्ही कोकण रेल्वेच्या एम डीं सह सर्व प्रशासनाला या संदर्भात किती बजेट लागेल यासाठी विचारणा करून पाठपुरावा चालू केला. आठ दिवसांनी सर्व कोकणातील रेल्वे स्टेशन कडे जाणारे रस्ते करण्यासाठी 35 ते 40 कोटी निधी आवश्यक आहे. असे सांगण्यात आले. हा प्रस्ताव चव्हाण साहेबांकडे मांडल्यानंतर चव्हाण साहेब म्हटले… एवढाच निधी लागणार !!!. या बरोबर सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा देशातला एकमेव जिल्हा असल्यामुळे कोकणातील रेल्वे स्टेशनचे वाराणसी रेल्वे स्टेशन सारखे,विमानतळा सारखे सुशोभीकरण केले तर पर्यटकांना वेगळे आकर्षण होऊ शकते. तुम्ही शंभर कोटीपर्यंत याचा आराखडा तयार करा. त्याला मी निधी उपलब्ध करून देतो असा शब्द कोकण रेल्वेच्या एम.डी व प्रशासनाला अधिकृत मिटिंग करून निर्देश देण्यात आले.
कोकण रेल्वेचे नियम, केंद्रातील रेल्वेचे नियम, महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे नियम ह्या बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. मा. रवींद्रजी चव्हाण यांनी अटी नियमांना जर मध्य काढला नसता तर हे काम होणे शक्यच नव्हते .पण अभ्यासपूर्वक हुशारीने व चातुर्याने यावर मार्ग काढण्यास रवींद्रजी चव्हाण यशस्वी झाले. या संदर्भातले करार सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस व माजी केंद्रीय मंत्री व खासदार मा.नारायण राणे व मा.रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच कोकण रेल्वेचे सर्व अधिकारी व मी व वहाळकर यांच्या उपस्थितीत करार पत्रांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यातील कामाला निधी पालकमंत्र्यांनी उपलब्ध करून दिला.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मार्फत कोकणातील सर्व रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ एकावेळी करण्यात आला. कामाला सुरुवात पण झाली आणि एक वर्षांमध्ये त्याची वचनपूर्ती 9 ऑगस्ट 2024 दिनी शुभारंभ कणकवली, सिंधुदुर्गनगरी, सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे करण्यात आली. 4 सप्टेंबर 2024 रोजी कुडाळ रेल्वे स्टेशनचा शुभारंभ करण्यात येत आहे.
एका प्रकल्पाचा पायाभरणी झाल्यावर मुदतीत त्याचा शुभारंभ होतो हे कोकणातील पहिलेच उदाहरण मा. रवींद्र चव्हाण यांनी कोकणाला दाखवून दिले आहे .
कोकणातील रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण व रस्ते दुरुस्ती याचे साक्षीदार म्हणून मी व सचिन वहाळकर होतो .यात खारीचा वाटा आमचा पण आहे हा आनंद मनोमनी आम्हाला आहे.
शासकीय स्तरावर कामाची सांगड घालण्याचा पूर्ण प्रयत्न मा.रवींद्र चव्हाण यांचे स्विय सहाय्यक श्री.अनिकेत पटवर्धन यांनी केले .
एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेली छोटी मागणी एवढी भव्य स्वरूपात होऊ शकते हे फक्त भारतीय जनता पार्टी मध्येच होऊ शकते. याची प्रचिती आमच्या हयातीतच आम्ही घेऊ शकलो.
कोकणाचे कॅलिफोर्निया होणार अशी स्वप्ने आम्ही खूप दिवस लहानपणापासून पाहिली.पण त्याचं खऱ्या रूपाने मुहूर्तमेढ पर्यटन जिल्हा आकर्षित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा मा. रविंद्रजी चव्हाण यांनीच केलेली आपल्याला पहावयास मिळते. मिळालेल्या संधीचा परिपूर्ण उपयोग करण्याचा प्रयत्न मा.रवींद्र चव्हाण साहेबांनी कोकणासाठी केलेला पाहावयास मिळतो.
धन्यवाद !!!
मानाचा मुजरा !!!
मा.रवींद्रजी चव्हाण साहेब
विजय केनवडेकर
जिल्हा उपाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग
माजी सदस्य,
कोकण रेल्वे सल्लागार समिती.

______________________________
*संवाद मीडिया*

*S संजना टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स*

*🎊✨ ️साजरे करूया दसरा ,दिवाळी, ख्रिसमस* 🎆🎇🧨☃️❄️🎄🎊

*✨️🚢 कॉर्डेलिया क्रूझ सोबत* !🛳️⛴️🚢

*सप्टेंबर, ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर 2024*

● *मुंबई – गोवा > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची > 2 रात्री 3 दिवस* 🏖

● *गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏝️

● *मुंबई – गोवा – मुंबई > 3 रात्री 4 दिवस* 🏖

● *मुंबई – लक्षद्वीप – मुंबई > 4 रात्री 5 दिवस* 🏖

● *मुंबई – कोची – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

● *मुंबई – गोवा – लक्षद्वीप – मुंबई > 5 रात्री 6 दिवस* 🏖

*📞अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*📠 ☎️ *संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स :*

*7350 7350 91// 7350 534 534*🚘🚖

*जाहिरात
————————————————
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा