मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या मार्फत उद्या दोडामार्ग तालुक्यातील 200 मंडळाना भजन साहित्याचे होणार वाटप
दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन
दोडामार्ग
गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता दोडामार्ग तालुक्यातील भजन मंडळानी शालेय शिक्षण मंत्री श्री दीपकभाई केसरकर साहेब यांच्याकडे मागणीनुसार दोडामार्ग तालुक्यातील 200 मंडळाना भजन साहित्य वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पुरूष-महीला युवासेना युवतीसेना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे व आपल्या गावातील शहरातील विभागातील भजन मंडळाना उपस्थित राहण्यास सांगुन प्रत्येक भजन मंडळानी सोबत कीमान 5 भजन मंडळातील सदस्य घेऊन उपस्थित राहावे.
या कार्यक्रमाला स्वतः श्री दीपकभाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, श्री राजनजी पोकळे,ज्ञ जिल्हाप्रमुख श्री अशोकराव दळवी, सुरज परब, शिवसेना महीला जिल्हाप्रमुख सौ निता कविटकर सावंत हे उपस्थित राहणार आहेत.
सदरचा कार्यक्रम सुशिला हाॅल दोडामार्ग येथे होणार आहे.
शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे