*थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन.
कुडाळ
सध्या सुरु असलेला खरी हंगाम हा सर्वात महत्वाचा आहे व भात पिकाची लागवड झाली असून, सद्यस्थितीत पावसाची उघडझाप व ढगाळ वातावरणामुळे पाणथळ जमिनीत भातपिकावर निळे भुंगेरे ,पाने गुंडाळणारी अळी, खोडकीडा, सुरळतील अळी,तुडतुडे,लष्करी अळी,गादमाशी या भात पिकाच्या प्रमुख किडी आढळून येतात. यामधूनच सद्यस्तितीत प्रामुख्याने निळे भुंगेरेंचा तुरळक प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासोबतच रोंगाचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येत असून, यामध्ये प्रामुख्याने पानावरील करपा, कडा करपा,व शेंडे करपा यांचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.
यामुळेच कृषी सेवक ओम राऊत यांनी शेतकऱ्यांना किड व रोग नियंत्रणाबाबत सल्ला देण्यासाठी ग्रामपातळीवर नानेली येथे गावबैठकीचे आयोजन करून थेट शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांना किड व रोग प्रत्यक्ष कसे असतात, त्यांची जीवनशैली कशी राहते,त्या भात पिकाला हानिकारक कशाप्रकारे ठरतात,त्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे केले पाहिजे याबद्दल गाव बैठक आयोजित केली, तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर नेऊन भात पिकावरील किड व रोग याबद्दल शेतकऱ्यांना योग्य ती ओळख करून दिली. यासोबतच त्यांचा जैविक पद्धतीने तसेच रासायनिक पद्धतीने बंदोबस्त कसा करावा याबद्दल कृषी सेवक ओम राऊत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतीशाळा वर्गातुनही शेतकऱ्यांना एकात्मिक किड रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं जात आहे.याचा एक भाग म्हणुन नानेली येथे गाव बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.आणि प्रत्यक्ष शेतामधे गेल्यावर असे दिसून आले की,
तुरळक ठिकाणी निळे भुंगेरेंचा व करपा यांचा प्रादुर्भाव दिसुन आला आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी ५० टक्के कारटॅप हायड्रोक्लोराईड १२ ग्रॅम किंवा ट्रायझोफाॅस ४०% प्रवाही २७ मिली किंवा ७५% अॅसिफेट २० ग्रॅम किंवा लॅम्डा सायहॅलोथ्रीन ५% प्रवाही ५ मिली १० लीटर पाण्यात मिसळुन उघडीप पाहुन फवारणी करावी,व तसेच करपा नियंत्रणासाठी मॅनकोझेब किंवा कार्बेन्डाझिम २५ ग्रॅम, कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.अशाप्रकारे कृषी सेवक ओम राऊत हे मा.ता.कृ.अधिकारी श्री पाटील सर, मा.मं.कृ.अधिकारी राऊत मॅडम व तसेच मा.कृषी पर्यवेक्षक सरमळकर सर व परब मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करत आहेत.