मालवण :
मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या प्रमुख संशयित आरोपी शिल्पकार जयदीप आपटे फरार असून गेल्या आठ दिवसापासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र त्याचा थांब पत्ता लागलेला नाही. सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी केली आहे, अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.
राजपूत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाचा हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यासह बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष वधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमाअंतर्गत मालवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून चेतन पाटील सध्या पोलीस कोठडीत आहेत.