You are currently viewing तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन विशेषांकाच्या सहसंपादक पदी डॉ.अशोक शिरसाट यांची निवड

तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन विशेषांकाच्या सहसंपादक पदी डॉ.अशोक शिरसाट यांची निवड

अकोला :

मूळचे अकोला जिल्हयातील देगांव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सहसचिव डॉ.अशोक शिरसाट यांची नुकतीच तिसऱ्या राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या विशेषांकांच्या सहसंपादक पदी निवड करण्यांत आली आहे. येत्या १४ डिसेंबर २०२४ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर (जळगांव खान्देश) च्या विद्यमाने आयोजित तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन होवू घातले आहे. या साहित्य संमेलनाची स्मरणिका / विशेषकांचे आयोजन व प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्याकरिता संपादक पदी प्रा.डॉ. मंदाताई नांदुरकर, अमरावती व सहसंपादक पदी जेष्ठ साहित्यिक डॉ.अशोक शिरसाट, अकोला यांची फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर, मुक्ताईनगर यांनी नुकत्याच घेण्यांत आलेल्या महत्वपूर्ण सभेच्या एका झूम मिटींगद्वारे निवड केली आहे. सहसंपादक पदी निवड केल्याबद्दल डॉ. शिरसाट यांनी शिवचरण उज्जैनकर सरांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा