*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्यनिनाद साहित्य मंच पुणे समूहाच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.प्रतिभा पिटके लिखित लेख*
*वाटचाल दैनिक हिंदुस्थानची…75 व्या यशस्वी कारगिर्दीची*
*त्रिवार नमस्कार ,दैनिक हिंदुस्थानला!*
*मनापासून अभिनंदन खूप शुभेच्छा* प्रिय दैनिक हिंदुस्थान,
सप्रेम नमस्कार!
१९४९ ते २०२४ पर्यंतचा तुझा प्रेरणादायी जीवनप्रवास! खूप अभिनंदन! इतकी वर्षे सतत कार्यरत राहणे आणि 75 व्या वर्षीही अजून यौवनात मी असे वाटणे सोपे नाही रे बाबा! भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर लेखणीच्या साहाय्याने प्रिय भारतमातेची सेवा करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व-बाळासाहेब मराठेंनी तुझी स्थापना केली . आर्थिक, राजकीय पाठबळ नसतांना एखादे वृत्तपत्र चालविणे, तेही निर्भीडपणे ! हे सोपे नव्हते! जहाँ चाह वहा राह! या न्यायाने दिवसेंदिवस प्रगतीपथावर असलेल्या तुला स्व बाळासाहेबांनंतर डॉ अरुण मराठेनी अधिक काळजीपूर्वक मोठे केले : तुझी प्रगती कशी होईल हा ध्यास घेऊन सगळी मराठे मंडळी नेटाने कामाला लागली . छपाईचे काम नीट झालेच पाहिजे व तुझे देखण्या रूपाचे दर्शन शहरी व ग्रामीण भागात सकाळी सकाळी झालेच पाहिजे हा स्व अरुणदादांचा अट्टाहास असे! आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती तरीही
कोणत्याही परिस्थितीत तुला प्रसिद्द करण्यासाठी जीवाचे रान करीत त्यांनी तुझी प्रगती होण्यासाठी जीवाचे रान केले. वक्तशीरपणा हा त्यांचा दैवी गुण! कामगारासोबत ते स्वतः छपाईचे काम करीत. वेळ पडली तर खिळे जोडण्याचे काम सुद्धा त्यांनी केले तू म्हणजे म्हणजे त्यांचा जीवकी प्राण! तुला विविध बातम्या ,घडामोडी कथा कविता हास्यविनोद यांनी सजविण्यासाठी अक्षरशः डोळ्यात तेल घालून त्यांनी लक्ष दिले तसेच आपले मत परखडपणे मांडताना ते कुणालाच घाबरत नसत!त्यांनी लिहिलेले अग्रलेख वाचून राजकारणी लोकांची झोप उडत असे . आपल्या अग्रलेखातून ते प्रखरपणे सगळ्यांचा समाचार घेत .ज्या मायेने आई आपल्या लेकराची काळजी घेते मुलाचा सर्वागिण विकास होण्यासाठी दिवसरात्र झटते तशी काळजी मराठे मंडळी घेत होते व आजही ती परंपरा चालू आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे एकदा अचानक आग लागून प्रेस जळून खाक झाली .पण डगमगणे हा शब्द मराठेच्या कोशातच नाही फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून नवजीवन मिळवून दाजीसाहेबांच्या तपोवनचा भक्कम आधार मिळवून तू नवीन रुपात प्रगट झालास! या घटनेने वाचकांच्या मनावर तू जादू केलीस लोक तुझ्यावर प्रेम करू लागले सगळे दिवस सारखे नसतातच. अमावस्येच्याकाळ्या कुट्ट रात्रीनंतर येणारा दिवस सोनेरी किरण घेऊन येतो तसेच झाले तुझे! तुझ्या स्वप्नांना आता पंख फुटले ,आणि वाचकांच्या मनात आपले स्थान पक्के करण्यास ती सज्ज झालास! हा आत्मविश्वास तुला दिलातो मराठेंच्या तिसऱ्या पिढीने हसतमुख नम्र आपल्या कामात सतत व्यस्त असणाने प्रबंध संपादक सन्मा. विलास व समस्त मराठे बंधूंनी ! त्यांच्याबद्दल व्यक्त होणे हे माझ्या कुवतीबाहेरचे आहे त्यांनी तुला अधिक सुंदर रूप दिले तू प्रत्येक घरी भल्या पहाटे कसा पोहचशील हे त्यांचे धोरण! वाचकांना तू हवाहवासा वाटतो एक दिवस थोडा उशिरा आलास तर लोक बेचैन होतात ह्याचे सारे श्रेय श्री विलास दादा विवेक दादा व समस्त मराठे परिवाराचे आहे सगळे एकापेक्षा एक नम्र व्यस्त असून सामान्य वाचकांच्या मागण्या पूर्ण करताना कधीही त्रस्त न होण्यच्या त्याच्या गुणांचे मला स्वतःला आश्चर्य वाटते! तूझे रूप अधिकाधिक साजरे गोजरे करण्यासाठी तुला सजविण्यासाठी सारे सज्ज असतात हे केवळ वाचकांचा तू अधिकाधिक आवडता होण्यासाठी ! लेख कविता स्फुट द्वारे आपले मत मांडण्याचा समान अधिकार इथेच मिळतो , भेदभाव न करता प्रत्येकाच्या लिखाणाला प्रसिद्धी दिली जाते सगळे धडपडत असतात रे तू अधिकाधिक प्रिय कसा होशील ह्यासाठी! स्वतःचा बडेजाव न दाखवता वैदेही वहिनी मनीषाआणि सगळ्याच मराठे स्त्रिया आपल्याला दिलेले काम करीत असतात। पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारा तू सगळ्यांना आपलासा वाटतोस !लिहिणाऱ्या हातांना बळ देणारे संपादक!आय एन एस च्या कार्यकारिणीत सलग 21 व्यादा बिनविरोध निवड होणे हे ऐऱ्या गबाळ्याचे काम नाही रे! अनेक सन्मान अनेक ठिकाणी पदाधिकारी असून तुझ्याकडे त्यांचे बारीक लक्ष असते याला कारण त्यांना मिळालेला मातोश्री स्व प्रभाताईंचा आशीर्वाद! अरे तुझ्या प्रगतीत तर त्यांचा सिंहाचा वाटा आहे हे विसरून नाही चालणार दैनिक हिंदुस्थानचा त्या आधारवड! तर डॉ अरुण मराठे हे प्रेरणास्थान! मातापित्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून उतराई होण्यासाठी २० नोव्हेंबर ह्या अरुण मराठेंच्या स्मृतिदिनी दैनिक हिंदुस्थान परिवारातर्फे आईच्या नावाने प्रभास सन्मान सुरू करून मराठे परिवाराची सामाजिक बांधिलकीची जाणीव किती उच्च कोटींची आहे हे साऱ्या समाजालाच आदर्श वाटावे असे आहे
प्रिय दैनिक हिंदुस्थान, तुझा व तुला मोठा करणाऱ्या मराठे परिवाराचा आम्हाला खूप अभिमान आहे आज 75 व्या वर्षात तू पदार्पण करीत आहेस। तरी तू चिरतरुण आहेस ह्याचा अभिमान आहे! एक दिवस तू दिसला नाहीस तर मनाची घालमेल होते! गोकुळातील गौळणीप्रमाणे
तुझे कौतुक पाहण्यासाठी सगळे उतावीळ असतात रे! तू असाच रहा ।किर्तीमान भव! आयुष्य मान भव! दिवसेंदिवस तुझी प्रगती होऊ दे! दशदिशात पसरू दे तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध। तुझे कौतुक करण्यासाठी लिहीन तितके थोडेच आहे.
तुझ्यावर नितांत प्रेम करणारी तुझीच
एक वाचक!
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३