You are currently viewing बैल पोळा

बैल पोळा

‌*ज्येष्ठ लेखिका कवयित्री उपक्रमशील शिक्षिका निवेदिका कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बैल पोळा*

 

आज पोळ्याचा सण

शेतकऱ्यांचं आनंदल मनं

 

भल्या पहाटे उठून

बैलांचे केले अभ्यंग स्नान

 

नाकात नवी वेसण

पायात छुमछुम पैंजण

 

शिंगांना गोंडे,बेगड लावून

गळ्यात फुलंमाळा,घंटी बांधून

 

अंगावर रंगीत झूल

बघूनी आनंदले लहान थोर

 

जसं बाशिंग नवरदेवाला

आणले सजवून

 

हळद,कूंकू लावून

ओवाळू निरंजन

 

पुरण पोळीचे आज खास भोजन

सोबत चारा पाण्याचे वैरण

 

 

ग्रामीण जीवन गेले फुलून

आज बैलांचा विसाव्याचा दिन

 

 

दर वरीस येई

पोळ्याचा सण

 

सर्जा राजा (बळी राजा)

करी शेतकऱ्यांच्या जीवनाचं सोनं

 

बळीराजा तुला त्रिवार वंदन!

 

 

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा