*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम बाल कविता*
*चिऊताई चिऊताई*
चिऊताई चिऊताई
कसली गं तुला इतकी घाई
सकाळी सकाळी उठते
चिवचिव करते
दाणे दाणे वेचण्या
इकडून तिकडे उडते
किती तुझी लगबग
घरटे बांधते पटापट
उन वारा थंडी पावसात
उब मिळते का गं घरट्यात
पिल्ले तुझी हुशार फार
एकाच घरट्यात राहती चार
पंख आले मोठी झाली
भुर्रकन उडू लागली
चिमणा तुझा सोबतीला
गवसणी घालते आकाशाला
चिऊताई चिऊताई
तुला कुणाची भिती बाई
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.