You are currently viewing जिथे जिथे तू जाशील

जिथे जिथे तू जाशील

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ यांनी चित्रकार दिनेश चव्हाण सरांनी रेखाटलेल्या चित्राला अनुसरून केलेली कविता*

 

*जिथे जिथे तू जाशील*

 

जिथे जिथे तू जाशील

तिथे तिथे मी येईल

पाठराखी तुझी रे मी धनी

तुझ्या सोबत राहील

 

साता जन्माची मी सोबती

वड तुझ्यासाठी पुजते

तुझ्या पावलांच्या पुढे

माझे पाऊल पडते

 

सुख दुःखाचा तू साथी

तुझ्या कष्टाची मी भागेदारी

भरले कपाळ घेऊन मी

करेल रे आधी वैकुंठाचा वारी

 

तुझ्या पाठीवर माझा नेहमीच

आधाराचा हात असेन

तुझ्या आधाराशिवाय

माझे जगणे नसेन

 

दोन चाकांचा हा संसार

दोघीजणी ओढत राहू

तुझ्या सोबत राहू दे मला

नको मागे पुढे होवू

 

संजय धनगव्हाळ

अर्थात कुसुमाई

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा