You are currently viewing कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीचा निषेध..

कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीचा निषेध..

कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीचा निषेध..

कणकवली

राजकोट किल्ला येथील छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत, म्हणुन त्या सर्व राजकीय विकृतीचा निषेध करण्यासाठी भाजप कणकवली तालुका वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भजन करत निदर्शने करत आज महाविकास आघाडी चा निषेध केला.
विशालगड अतिक्रमण, राष्ट्रवादी नेत्यांचे किल्ल्यावरील प्रणयी चित्रीकरण, कर्नाटक सरकार मध्ये काँग्रेसची सत्ता आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे हटवण्यात आलेले तैलचित्र या विषयावर आजच्या आंदोलनातून आघाडीच्या नेत्यांना प्रश्न विचारले. राजकोट वर महाराजांचा पुतळा उभारल्या पासून कधी बघायला सुध्दा न आलेले दुर्घटनेचे राजकरण करण्यासाठी मात्र लगेच जिल्ह्यात आले या सर्व मानसिकतेचा निषेध आज भाजपच्या वतीने करण्यात आला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री, माजी जि प अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा चिटणीस संतोष कानडे, मेघा गांगण, सोनू सावंत, संतोष पुजारे, सर्वेश दळवी, अण्णा खाडये, प्रकाश पारकर, गणेश तळगावकर, समीर प्रभुगावकर, सागर राणे, महेश लाड, संदिप सावंत, चिन्मय तळेकर, स्वप्नील चिंदरकर, राजू पेडणेकर, प्रशांत राणे, शैलेश सुर्वे, दिनेश मुद्रस, बबलू पवार, विजय इंगळे, श्रेयस चिंदरकर, अभय गावकर, परशुराम झगडे,पपू ब्रम्हदडे, अभिजित सावंत, बाबू नारकर, लवू परब,मंदार मेस्त्री, रोहित ठाकूर, सर्वेश बागवे, सागर पवार उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा