कणकवली शहराच्या विकास प्रक्रियेत किशोर धुमाळे यांचा मोठा वाटा- समीर नलावडे.
कणकवली नगरपंचायत कर विभागातील वरिष्ठ लिपिक किशोर धुमाळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव.
कणकवली :
कणकवली शहराच्या विकास प्रक्रियेत किशोर धुमाळे यांचा मोठा वाटा आहे. अचूक नियोजन आणि अभ्यासू किशोर धुमाळे हे नेहमी कामाशी प्रामाणिक राहिले आहेत. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्यात कणकवली नगरपंचायत कर वसुलीत प्रथम क्रमांकावर राहिली आहे. याचे श्रेय केवळ किशोर धुमाळे यांना जाते. असे प्रतिपादन कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले. कणकवली नगरपंचायत कर विभागातील वरिष्ठ लिपिक किशोर धुमाळे यांचा सेवानिवृत्ती पर निरोप समारंभ कणकवली नगर वाचनालय सभागृहात संपन्न झाला. यावेळी मुख्याधिकारी गौरी पाटील,माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, व्यापारी संघाचे अध्यक्ष उद्योजक दीपक बेलवलकर,अभी मुसळे ,राजश्री धुमाळे,राजू धुमाळे, दादा कुडतडकर, किशोर राणे, भाई साटम, ज्येष्ठ पत्रकार अशोक करमळकर, तत्कालीन मुख्याधिकारी श्री कंकाळ,प्रशासकीय अधिकारी अमोल आघम,तसेच नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माझी नगरसेविका किशोरी धुमाळे,दादा कोडतरकर,किशोर राणे,भाई साटम, अशोक करमाळकर,बंडू हर्णे, मुख्याधिकारी कंकाळ यांनी मनोगत व्यक्त केले.किशोर धुमाळे हे हुशार व चतुर व्यक्तिमत्व आहेत. एका पायाने अपंग आहेत परंतु कर विभाग व इतर विभागातील कामांमध्ये आपल्या कामात नेहमी पुढे असतात. श्री धुमाळे यांनी विरोधक व सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय साधून नगरपंचायत च्या कामाला नेहमी गती दिली आहे. असे उद्गार उपस्थितांनी काढले. त्यांना यापुढे देखील काही कालावधीसाठी कामावर ठेवण्याबाबत उपस्थित आणि मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली. यावेळी सत्कारमूर्ती किशोर धुमाळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की नगरपंचायत मध्ये काम करत असताना सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी योग्य तो समन्वय साधून काम करत राहिलो. कणकवलीकरांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले हेच मी भाग्य समजतो प्रशासकीय सेवा करताना त्यांचे मला सहकार्य लाभले. त्या सर्वांचा मी आभारी आहे .असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नगरपंचायतीतील पाणीपुरवठा विभागातील सुभाष परब यांचे देखील सेवानिवृत्ती पर उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या. नगरपंचायतीच्या वतीने किशोर धुमाळे यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नव्याने दाखल झालेल्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.