You are currently viewing श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -६१ वे

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -६१ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण वी. देशपांडे लिखित श्री गजानन विजय काव्यांजली*

 

।। जय गजानन ।। गण गण गणात बोते ।।

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प -६१ वे

अध्याय – ११ वा, कविता – १ ली

—————————————-

अनुभूती ही फार मोठी । जन हो माझ्याअसाठी ।

वाटे, आहे माझ्यापाठी । श्री स्वामी गजानन ।। १ ।।

 

दहा अध्यायाचे लेखन झाले । काव्यपुष्प साठ वाहिले ।

सार- लेखन आरंभिले । श्री गजानन कृपेने ।। २ ।।

 

पारायण मी जेंव्हा जेंव्हा करी । उर्मी एक दाटे मम् अंतरी ।

वाटे लिहावी गजानन कथा सारी । संक्षिप्तरूपे, नव्या पिढीसाठी ।। ३ ।।

 

हेतू हा माझ्या अंतरीचा । स्वामींनी जाणीला साचा ।

स्पर्श आशीर्वादाचा । होई या लेखनास माझ्या ।। ४ ।।

 

संतकवी दासगणूचे कार्य समोर । ते किती थोर ।

त्यांच्या प्रतिभेसमोर । मी सामान्य मोर, जाणीव मज ।। ५ । ।

 

श्री गजानन माऊली । धरी कृपेची सावली । स्फूर्ती लेखनास दिली । मजला श्री गजानन स्वामींनी ।। ६ ।

 

आता अध्याय अकरावा आरंभ । करू या पुढील कथेस प्रारंभ । असे हा आगळा शब्द- समारंभ । श्री गजानन कृपेने

।। ७ ।।

 

स्वामी आले बाळापुरासी । दास नवमीच्या उत्सवासी ।

मुक्काम सदनासी । बाळकृष्ण बुवाच्या ।। ८ । ।

 

स्वामींचे भक्त इथे दोन होते । सुकलाल, बाळकृष्ण असे त्यांचे नाव होते । पाटील भास्कर, बाळाभाऊ,, गणू,

जगदेव दिंडोकार हे सोबत होते । यावेळी स्वामींच्या ।।९।।

 

दासनावमीचा उत्सव पार पडला । परी प्रसंग एक घडला ।

कुत्रा एक पिसाळलेला । भास्करासी चावला ।। १० । ।

******************************************

करी लेखन हे क्रमशः कवी अरुणदास

___________________________

कवी- अरुणदास ” अरुण वि.देशपांडे – पुणे.

——————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा