*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”रक्षक श्रीकृष्ण”*
श्याम सुंदर मोहना पाहते मी आशेनं
भाकते करुणा अभय द्यावे वरदानIIधृII
बालिकांचे होई धोकादायक जीवन
आशिकांचे केव्हाही चाळवते मन
बुद्धी द्या सर्वांना कळ्यांचे करण्या रक्षणII1II
कसा प्रगटसी द्रौपदीचे वेळी संकटात
मीरासाठी करिसी प्रसंगी विष प्राशन
कुब्जा सह भक्तांसाठी आलासी धावूनII2II
निभावे आदर्श रूपे माता पत्नी बहीण
त्यागी मायाळू जन्मदाती जपे स्त्रीपण
नाते महत्त्वाचे मानते रक्षाबंधन II3II
श्री अरुण गंगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.