You are currently viewing मैत्रीचा दीपस्तंभ

मैत्रीचा दीपस्तंभ

*ज्येष्ठ पत्रकार संपादक साहित्यिक बाबू फिलिप्स डिसोजा लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मैत्रीचा दीपस्तंभ*

 

मैत्री आयुष्यातील हो अमोल ठेवा

करावा जगाने ज्याचा मत्सर हेवा

हितगुज मोकळे साधती संवाद

मार्ग दाखवे सदा मिटवूनी भेवा

-1-

मैत्री आनंदाचा अक्षय सुख ठेवा

निर्लोभी सुदाम खरा आठवे देवा

स्थान मैत्रीचे असे सर्वोच्च नात्यांत

स्मरे निरपेक्ष निष्काम मित्र सेवा

-2-

मैत्री दृढ विश्वासाचा अभेद्य सेतू

अंतरी ठेवितो नित्य कल्याण हेतू

बोल उपदेशाचे वाटती निर्भीड

पाठिशी उभा ठेवी दूर राहू केतू

-3-

 

:बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर

पुनावळे पुणे- ४११०३३

मो. 9890567468

प्रतिक्रिया व्यक्त करा