You are currently viewing पथनाट्य समाज प्रबोधनाचे नाटक आहे – प्रा. जगदीश संसारे

पथनाट्य समाज प्रबोधनाचे नाटक आहे – प्रा. जगदीश संसारे

*पथनाट्य समाज प्रबोधनाचे नाटक आहे – प्रा. जगदीश संसारे*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

कीर्ती महाविद्यालय येथे गुरुवार, २९ ऑगस्ट २०२४ रोजी एनएसएस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पथनाट्य प्रशिक्षण शिबीरात बोलताना मुख्य प्रशिक्षक प्राध्यापक जगदीश संसारे म्हणाले,” पथनाट्य हे प्रामुख्याने समाजप्रबोधनाचे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. पथनाट्यातून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडता येते. पथनाट्य करणारे कलाकार समाजाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहू लागतात आणि माणूस म्हणून जगतात.” महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोग यांनी गणेशोत्सवामध्ये १५१ भागात पथनाट्य सादर करण्याचा मानस व्यक्त केला. महाविद्यालयाचे एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी आणि मुंबई विद्यापीठातील क्षेत्रीय समन्वयक प्रा. अंकुश दळवी प्रशिक्षणाविषयी बोलताना म्हणाले,” अशा प्रकारच्या प्रशिक्षणामुळे पथनाट्य अधिक दर्जेदार होईल विद्यार्थ्यांना पथनाट्याचा सर्वांगीण अभ्यास करता येईल.” महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी प्रतिभा बिस्वास म्हणाल्या,”पथनाट्य सादर करणारे विद्यार्थी संवेदनशील असतात. ते स्वतः जागरूक नागरिक असतात.” त्यावेळी एनएसएसच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. पूजा कांबळे आवर्जून उपस्थित होत्या.
जवळपास ५० स्वयंसेवकांनी या पथनाट्य शिबिराचा लाभ घेतला. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी ओमकार वाक्कर या स्वयंसेवकाने अथक परिश्रम घेतले. त्याला साहिल, नम्रता, साई, सोहम ह्यांची साथ लाभली.
जूनियर महाविद्यालयातील स्वयंसेविका वेनिला कदम हिने सूत्रसंचालन केले. सलोनी भोसले हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि पाहुण्यांची ओळख करून दिली. तर अथर्व फाळके यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

_____________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*🏠 SK 🏠*
*VASTU*
*CONSULTANT*

*🏘️🏘️ SK VASTU CONSULTANCY* 🏘️🏘️

*🔸We solve all problems related to Vastu*

*🔹We suggest solutions for Vastu Dosha*

*🔸We solve all Vastu Kundli related problems*

*_Vastu specialist in house, hotels, mall, school, college, showrooms, shop, factory, hospital_*🏥🏬🏘️🏢🏣

*Contact details:-*
📲9892009443
📲9930787451

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा