You are currently viewing राजकोट प्रकरणी गुन्हे दाखल

राजकोट प्रकरणी गुन्हे दाखल

राजकोट प्रकरणी गुन्हे दाखल

सिंधुदुर्गनगरी

 मालवण राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळलेल्या ठिकाणच्या परिसरात आरोपी आल्यावर बेकायदा जमाव करुन आपले राजकीय पक्षाच्या हेतून प्रेरित होऊन आपसात उपहासात्मक दोन्ही पक्षाच्या उभयत्याने आमने सामने आल्यावर घोषणेबाजी केली.

 पोलीस जमाव शांत करण्याचे कर्तव्य करीत असताना त्यांना धाकाने बोलून अटकाव करत होते. या बेकायदेशीर जमावतील कृत्यात २ पोलीसांना दुखापत झालेली आहे. त्याचप्रमाणे राजकोट किल्याची तटबंदी ही सार्वजनिक संपत्ती असल्याचे माहित असतानाही तटबंदीवरी जांभे दगड काढून खाली फेकून देऊन नुकसान केलेले आहे.

          त्यामुळे ४२ ज्ञात व १०० अनोळखी इसमांविरुध्द मालवण पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता-२०२३ चे कलम १२१(२),१८९(२), १९१(२), १९०,११८(२),२२३ सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ कलम ३, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७/१, ३७/३, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास मालवण पोलीस करीत असल्याचे पोलीस प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा