*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बकुळगंध*
**********
असे कसे कां कधीतरी
सहज काही विसरता येते
रुतलेल्या त्या भावनांना
कां अलगदी खुडता येते
भावस्पर्शी , शब्दसंवेदना
हृदयांतरात नित्य जागते
छळतो तो तुझाच दुरावा
मन विकल होऊनी जाते
हुरहुरता क्षणक्षण हळवे
घालमेल जीवाचीच होते
जरी सत्य , की दुर्मिळ तू
उमजणेच दुरापास्त होते
वेदनेची जखम ही ओली
मनी संथ पाझरत असते
साक्षी तुझी तीच बकुळी
अजुनही सुगंधा गंधाळते
********************
*रचना क्र. १९१
*#©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞( 9766544908 )*