*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री पल्लवी उमेश लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कृष्णरंग….*
कृष्ण रंगात गीत गाता
सूरदास तो जन्मा आला
मीरा ही प्रेम दिवानी
कृष्ण रंगात गेली रंगुनी ।
चितचोर कान्हा साजरा
गोपीकांचा वेढा निराळा
वेडी ही राधा भुलली
कृष्ण रंगात न्हाहुनी गेली।
कालियामर्दन करुनिया
ग्वालबाळांसी रक्षयिला
गोवर्धन उचलुनी धरीला
केले पराभूत इंद्रदेवाला।
देवकीचा आठवा गर्भ
यशोदेच्या कुशी आला
कान्हा गोकुळासी वाढला
मथुरेसी श्रीकृष्ण जाहला।
सखा सुदामा अर्जुनाचा
बंधु बलराम द्रौपदीचा
पती रुक्मिणी सत्यभामा
असे विश्वव्यापी त्राता।
गीता रुपी ज्ञान दौलत
रिती केली ही मुखोद्गत
डुंबूनी सवे आम्ही त्यात
करी रसपान कृष्ण रंगात
…………………………….
© पल्लवी उमेश
जयसिंगपूर